19-02-2020 - 19-02-2020

JNNURM ह्या अंतर्गत *आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी 2007 साली 160 बिल्डिंग 6250 फ्लॅटची घरकुल योजना* उभारण्यात आली. आज ह्या घरकुल योजनेची फेडरेशन अतिशय प्रागतिक विचार करत मार्गक्रमण करत आहे. सात मजली 160 बिल्डिंग असलेल्या ह्या फेडरेशनने ठरविले की प्रत्येक बिल्डिंग वर सोलर पॅनेल लावावेत ज्यायोगे, प्रत्येक बिल्डिंगच्या वीज खर्चात दर महिन्याला 10 ते 14 हजार बचत होईल. ह्याचाच अर्थ, दुर्बल आर्थिक गटातील नागरिकांचे उत्पन्न वाढेल. *विशेष महत्वाची बाब म्हणजे ह्या फेडरेशन ची इच्छा आहे की जी काही बचत होणार आहे, त्यातील काही भाग परत घरकुल योजनेत महिला सबलीकरण, विद्यार्थी मार्गदर्शन असे सामाजिक उपक्रम त्यांना राबवायचे आहेत* विचार तर चांगलेच पण सोलर सिस्टीमचा खर्च देखील खूप जास्त, ह्या नागरिकांना न परवडणारा, परंतु *जेव्हा तुम्ही स्वविकासा साठी चांगल्या कामा साठी एक पाऊल पुढे टाकता तेव्हा हजारो हात तुमच्या मदती साठी पुढे येतात*. साधारण 8 कोटी रुपये खर्च करून, *1.6 MW ची सोलर सिटी* ह्या घरकुल योजनेत करायची हा उद्देश आहे Datum System आणि घरकुल फेडरेशन चा. *5 बिल्डिंग चा पथदर्शक प्रकल्पाचे* आज शिवजयंतीला उदघाटन झाले, 27 लाख रुपये खर्च असलेल्या ह्या प्रकल्पाला *CSR अंतर्गत रुपये 17.5 लाखाचे अनुदान मिळाले आहे पितांबरी ह्या प्रमुख ग्राहकोत्पादक कंपनी कडून* आणि हा प्रकल्प *रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास* च्या माध्यमातून अमलात येणार आहे. रोटरी क्लब सहवास अर्थातच अनेक सामाजिक कामासाठी घरकुल फेडरेशनला मार्गदर्शन / मदत करणार आहेत.

Project Details

Start Date 19-02-2020
End Date 19-02-2020
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area