अंकशास्त्राची सफर

Meeting Details

Meeting Date 23 Dec 2022
Meeting Time 19:30:00
Location Dnyanada Prashala DP Road, Pune 411052.
Meeting Type Regular
Meeting Topic अंकशास्त्राची सफर
Meeting Agenda विकली मिटींग
Chief Guest देशपांडे सर
Club Members Present 24
Minutes of Meeting अंकशास्त्राची सफर M R Deshpande अंकशास्त्राची सफर हा देशपांडे सर म्हणजे मनोज देशपांडे यांनी जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि सही करण्याची पध्दत यावरून माणसाचा स्वभाव, वागणूक आणि इतरांशी वागण्याची पद्धत, समाज, कुटुंब इथं त्याचं किंवा तिचं वर्तन यांचा या अंकांवरुन कसा अंदाज बांधायचा हे देशपांडे सरांनी काल शुक्रवारी २३डिसेंबर ला आपल्या विकली मिटींग मधे फारच सुंदर पद्धतीने सांगितलं. हे सांगताना त्यांनी खुसखुशीत विनोद व निदा फाजली, इलाही जमादार, सुरेश भट प्रभूतींच्या गजला व शेर यांचा फार सुरेख उपयोग केला. dd-mm-yyyy या फॉर्ममधील जन्मतारखेमधील अंकांची बेरीज करून मूल्यांक व भाग्यांक कसा काढायचा व वयाच्या ३० व्या वर्षांपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत मुल्यांक व नंतर भाग्यांक कसे प्रभावी ठरतात हे देशपांडे सरांनी सांगितले. ( m+m - ही बेरीज एक अंक येईपर्यंत आणली केली की तो मूल्यांक आणि m+m+d +d +y+y+y+y यातून येणारा अंक हा भाग्यांक ) त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ० ते ९ या अंकांबद्दल पुढील माहिती मिळाली. 1.. .. १ हा सूर्यासाठी हे लोक साधारण agile n alert चपळ, , सडपातळ असतात , ते पांढरे किंवा branded कपडे वापरतात - त्यांच्यात leadership qualities असतात आणि जिथं जातील तिथं लोकांना एकत्र करून पुढे जातात एक म्हणजे राजा...त्यांच्या वाकड्यात जाऊन चालत नाही जे यांच्या साठी काम करतात त्यांची हे काळजी घेतात. २... २ म्हणजे चंद्र म्हणजे जणू राणी...attention seeking... Moody... चंद्राच्या कलेप्रमाणे स्वभाव... त्यांच्या ठायी moodswings असतात - ते गोरे किंवा उजळ असतात , आणि caretaker ही ३... हे लोक गुरु... उत्तम मार्गदर्शक, सल्लागार, mentor. असतात .- देवांचे गुरु बॢहस्पती तसे हे ४...४ म्हणजे हर्षल...हे जनरली back stageला असतात , खूप scholar, पण हे impatient असू शकतात त्यांना सारखा घाम येतो - त्यांची अनेक प्रसंगात उदा. ट्रॅफिक जॅम मध्ये घालमेल होते . अस्थिरता अस्वस्थता सावलीसारखी यांच्या मागे असते ... हे लोक technical असतात - त्यांनी श्वास सावकाश घ्यावे, ५... म्हणजे बुध...हे राजकुमार..हुशार असतात पण तरीही always seek expert guidance , don't work without advice or help, कायम smiling व हसतमुख असतात. ६..हे लोक शुक्र...दैत्यांचे गुरु.... साहित्य संगीत कला...फेलोशिप..प्रवास, अत्तराची आवड असणारे ..रसिक असतात ७.. म्हणजे नेपच्यून, केतू...गूढ शास्त्र... intuition... अंतर्मुख... विचार करून निर्णय घेणारे असे असतात ८... म्हणजे शनी...यांना नैतिकता,morality महत्वाची , legal- कायद्याने .वागणारी असतात .. प्रामाणिक...व्यवसायात, खाजगीत...कायम यांची कामं उशीरा होतात, पण ती trustworthy - व्यवसायात वगैरे विश्वास ठेवावा अशी असतात - यांना काळा रंग आवडतो, ९.. हे लोक म्हणजे मंगळाचा प्रभाव असणारे ... सेनापती...बिग ब्रदर...फ्रेंडलिस्ट मधे असायलाच हवी अशी ही मंडळी ...कायम मदतीला तयार..dashing Always ahead प्रत्येक अंकाचं वैशिष्ट्य सांगताना देशपांडे सरांनी दोन अंकांमधील आपापसातले संबंध कसे असतात..‌मग ते नवराबायको असैत किंवा आई मुलगा किंवा वडील मुलगी हे सांगितलं - २ आणि ४.. कायम खटकतं ३ आणि ६...नियम पाळणारा व न पाळणारे १ आणि ८... बिल्कुल जमतं नाही...१ लगेच करु...८ उद्या करु २ आणि ६....असं करू तसं करु आणि तू बोलत रहा मी ऐकत रहातो असे त्यांचे एकमेकातले संबंध असू शकतात मोबाईल नंबर मधल्या अंकांवरूनही काही अंदाज काढता येतात असं कळलं ...मोबाईल नंबर मध्ये १, २.असतील तर savings करणारे , १ आणि ८ असतील ....घर के बाहर...no home comfort असणारे , 9 आणि 6असतील तर management मधले. देशपांडे सरांनी १-९ अंकांबद्दल सांगितलं पण शुन्याबद्दल ते बोलले नाहीत - बहुदा Zero शून्य हे पूर्ण ब्रम्हांड असावं आणि त्यात अडकलं की दैनंदिन व्यावहारिक जगातल्या कामांकडे दुर्लक्ष आणि मग delay in work.. तसंही जन्मतारखेत मूल्यांक किंवा भाग्यांक शून्य "०" येताच नाही. सही वरून माणसाचं व्यक्तिमत्व ओळखणं ही एक कला आहे हे काल कळालं. Sign reflects subconscious mind of a person हे काल कळालं. A. B Joshi हे नाव आणि त्यांच्या सही करण्याच्या प्रकारांवरून तो माणूस कसा असू शकतो हे देशपांडेंनी फार खुमासदार पद्धतीत सांगितलं. या नावातलं A ...म्हणजे self, B ...father or mother आणि J oshi... म्हणजे wife Third letter refers to wife or mother. आडनाव सुरवातीला म्हणजे Joshi A B अशी सही करणारे emotional असतात असं सांगताना Doing Action by emotion is wrong हे कळतं . ज्याची Unreadable sign म्हणजे नीट वाचता न येणारी सही असते त्यांचं व्यक्तीमत्व न कळणारं असतं. सही मधलं पाहिलं अक्षर मोठं - First letter big असेल तर माणूस कर्तृत्ववान - Third letter big असेल तर more weightage to wife or mother असे काही निष्कर्ष काढता येतात. आपली सही सही असल्यास नक्कीच प्रगती होते आणि नातेसंबंध दृढ होतात, असं देशपांडे सरांच्या पत्रकावर लिहिले आहे म्हणजे सही सही असेल तर कामं सही होतात, आयुष्य सही होतं असं म्हणायला हरकत नाही जो पुरुष किंवा स्त्री सहीमध्ये वडील किंवा नवरा यांचं लेटर ठेवत नाही त्यांना संघर्ष करायला लागतो असं देशपांडे सरांच्या बोलण्यातून कळालं . आईचं प्रेम नैसर्गिक असत आणि बायकोचं... conditional love असं जरी देशपांडे म्हणाले ते आई बाबतीत जरी खरं असलं तरी बायकोबद्दल सरसकट म्हणता येणार नाही असं मला वाटलं. पण वर्तमान चांगलं तर भविष्य चांगलं आणि आई मुलगा, बाप व मुलगी यांच्यात चांगलं नातं असेल तर मुलगा किंवा मुलगी त्यांच्या पार्टनरला सुखी ठेवतात हे मात्र खरं . Man - माणूस म्हणजे ...ego आणि Woman म्हणजे emotion - Don't hurt ego or emotion of anyone हे सर्वानी आचरणात आणायला काहीच हरकत नाही. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मनाप्रमाणे जगायचे - गुंतत गेलो दोघे आपण अशा गजला ऐकवून देशपांडे सरांचा कार्यक्रम संपला. रो संतोष जोशींनी देशपांडे सरांची सुरवातीला ओळख करून दिली होती तर ॲन धनश्री यांनी आभारप्रदर्शन केले. कुणाचा या numerology किंवा ग्राफॉलॉजि वर विश्वास असो व नसो - पण चांगले विचार व आचारपद्धती आचरण करायला काहीच हरकत नाही देशपांडेंनी सांगितलेले ३ सोपे उपाय अमर्याद आनंद मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. Three exercises to do to get abundance of pleasure.... १ विस्तिर्ण पसरलेले आकाश रोज पहा २ हिरव्या झाडांकडे पहा... ३. जलाशयाचे पहा ... प्रगती , अथांग आनंद मिळवा रो राहुल लाळे