Philosophy and Kathak

Meeting Details

Meeting Date 09 Dec 2022
Meeting Time 19:30:00
Location Dnyanada society hall, Karvenagar, Pune 411052.
Meeting Type Regular
Meeting Topic Philosophy and Kathak
Meeting Agenda Weekly Meeting
Chief Guest Amala Shekhar
Club Members Present 18
Minutes of Meeting Philosophy n Kathak कथ्थक हा एक रंगमंचावर सादर होणारा भावमुद्रा , हस्तमुद्रा आणि पदलालित्याची कलात्मक सांगड घालणारा नृत्याविष्काराचा प्रकार, एवढीच माहिती होती. पण कालच्या सहवासच्या विकली मिटिंगमध्ये अमला शेखर यांच्या फिलॉसॉफी आणि कथ्थक या सादरीकरणामुळे कथ्थकच नाही तर एकूणच संगीत, कला, नृत्य यांच्याकडे पहायची वेगळी दृष्टी मिळाली. काल अमलाजींना वेळ कमी मिळाला किंवा त्यांचा असं विश्लेषण करायचा नवीनच प्रयत्न असावा पण तरीही त्यांच्या अभ्यासपूर्ण सांगण्यावरुन अनेक नवीन गोष्टी समजल्या नाट्यशास्त्र, अभिनयदर्पण, नृत्यशास्त्र या खरं तर रंगमंचिय कला पण त्यांचा वेदांशी असणारा संदर्भ काल कळला - ऋग्वेद... संहिता, यजुर्वेद... अभिनय, सामवेद...नृत्य गायन, अथर्ववेद...रस असा वेदांमध्ये या सर्वांशी जोड आहे हे अमलजींनी सांगितलं. याबरोबरच चार पुरषार्थ....धर्म अर्थ काम मोक्ष, चार आश्रम..ब्रम्हचर्य, संसार, वानप्रस्थाश्रम, संन्यास , आणि पंचमहाभूते म्हणजे पंचमहाभूते -जल पृथ्वीआकाश वायू अग्नी या सर्वांचा कथ्थक आणि इतर नृत्यप्रकारांशी - त्यातील भावमुद्रेशी - कशी जोडली गेली आहे हे अमलजींनी प्रात्यक्षिकासकट सादर केलं. आणि ते करताना मुद्रांचे ध्यान, त्रिशूल, पताका हे प्रकार समजावून सांगितले. त्यांचं ऐकून असं वाटलं की नृत्यात - कलेत १०० % मेंदूचा वापर होतो - आपण निसर्गात जातो तेंव्हा आपल्याला असीम आनंद मिळतो कारण तिथे निसर्गाचं अमर्यादित रूप आपल्याला पाहायला मिळतं - एक Unknown, unlimited pleasure तिथे मिळतं . तिथं वेगळीच स्पंदनं आपल्याला अनुभवायला मिळतात - एक परिपूर्णता मिळते - अमर्याद सुखाबरोबर - एक उजेडाकडे - प्रकाशाकडे जायची इच्छा - भावना उत्पन्न होते. एक ब्रम्हानंद मिळतो - वर्तमानात जगणं.. Mindfulness मिळतो असं या फिलॉसॉफी आणि कथ्थक कार्यक्रमातून शिकायला मिळालं हे नक्की !! Rtn. Nandakumar Ghule introduced Mrs Amala Shekhar and PE Rtn Pratibha Jagdale gave Vote of Thanks. Pres. Rtn . Ajay felicitated Mrs Amala. रो राहुल लाळे