Minutes of Meeting |
RCP Sahawas Mutatkar Ajay: Good morning... *सहवासीय*,
First Fellowship Synergy meeting of newly formed Friday Club *शुक्रांगण*, yesterday, was a huge success with attendance of around 140 members. This alliance of like-minded clubs like *RCP Sahawas* will surely ensure quality of programme, innovative projects and freshness in approach. Listening to *वृक्षवल्ली ताई-संध्या चौगुले* was like watching a biopic as to how an ordinary woman can do an extraordinary things if she is ready to sacrifice, struggle and sustain in extremely tough conditions and unfavorable neighborhood. She narrated her life stating how society dislike crazy people like her who wants to Plant & Plant. She said, *कारण कशासाठी वेडं व्हायचं असतं, हे नको त्या कारणासाठी रक्तबम्बाळ होणाऱ्यांना कळत नसतं*।
Sandhya Chougule is working tielessly on all Rotary Focus areas like - environment, water sanitation, maternal health, education , Women empowerment
Thanks Sudhir, Yashwant, Nivedita, Pratibha, Dhanashri, Sangita, Tanaji & Nisha Sawant, First Lady Aparna for coming all the way to MCCIA Trade Tower, S B Road.
*झाड़ तोड़ायचे, कापायचे आणि लगदा करायचा*,
*कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, छापायचे एवढा खटाटोप कशासाठी...*
*सरळ झाड़च वाचावे*...
Rtn. Ajay Mutatkar
President, RCP Sahawas
[30/07, 09:25] RCP Sahawas Mutatkar Ajay: नमस्कार,
काल डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील एक अप्रतिम मिटींग अटेंड केली. एक वेगळाच प्रयोग ११ विविध क्लब्जच्या प्रेसिडेंटस् नी केला आहे. शुक्रवारी भेटणारे क्लब्ज एकत्र येऊन मिटींग, ही संकल्पनाच खूप आवडली. नाव ही अतिशय सुरेख आणि सार्थ असे दिले आहे, *शुक्रांगण* आपण रोटरीमध्ये येतो ते मैत्र भावनेनी(निदान मी तरी हे कायम मनाशी निश्चित केले आहे. आपण इथे मैत्री करायला आलो आहोत, बाकी गोष्टी त्यानंतर येतात) आणि इथे काल मला ११ क्लब एकत्र दिसले. बरं नेहमीप्रमाणे चित्र अजिबात नव्हते, की होस्ट क्लब खूप, पण हाॅल रिकामा. बरेच दिवसांनी खूप लोकं एकत्र पाहिली रोटरी मिटींगसाठी. आयोजन ही उत्तम केले होते.
खरे म्हणजे याचे फ्लायर आधी आले होते, कार्यक्रम चांगला होईल असे कळत होते, तरी देखील मी जायचा विचार असा केला नव्हता, कारण क्लासच ७.३० पर्यंत असतात. पण प्रेसिडेंट मधुराचा (लोकमान्यनगर क्लब) मेसेज आला, की तुझ्या ॲव्हेन्यूचा कार्यक्रम आहे ये. मधुराला तुम्ही सगळे ओळखताच, तिची आज्ञा मोडणे शक्य नाही. गडबडीने क्लास उरकून कार्यक्रमाला पोहचले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. श्रीमती संध्या चौगुले यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांची जिद्द, कामाबद्दलची निष्ठा केवळ अवर्णनीय. जे लोकं काम करू इच्छितात त्यांना काम करू न देणे ही वृत्ती सर्व थरात आहे हे जाणवले. ह्या संकुचित वृत्तीला संध्याताईंनी आणि त्यांच्या कुटुंबानी ज्या धैर्याने तोंड दिले ते प्रेरणादायी आहे.
शुक्रांगणमध्ये असेच दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळतील असे कालचा कार्यक्रम ऐकून वाटले. सर्व प्रेसिडेंटस् चे अभिनंदन, आणि पुढील वर्षभरासाठी शुभेच्छा. ????
रो गौरी शिकारपूर
डायरेक्टर, पर्यावरण
डिस्ट्रिक्ट 3131
[30/07, 09:27] RCP Sahawas Mutatkar Ajay: Message from Gauri Shikarpur who attended the program.IPDG Rtn. Pankaj Shah was also present..
[30/07, 09:38] RCP Sahawas Mutatkar Ajay: कालचा कार्यक्रम अतिशय दर्जेदार झाला. एक स्त्री मनात आणलं तर काय करू शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे संध्याताई. आपण ठरवलेल्या ध्येयाच्या प्रति प्रामाणिक निष्ठा असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकतं नाही ही प्रेरणा संध्याताईंच्या जीवन प्रवासातून उलगडली.त्यांच्या जिद्दीला सलाम.??
धन्यवाद अजयजी आणि अपर्णा ताई.
[30/07, 11:32] RCP Sahawas Mutatkar Ajay: *सामान्यातले असामान्यत्व*
असेच वर्णन कालच्या कार्यक्रमाचे करता येईल.
अगदी लहानशा खेडेगावातील पिठाची गिरणी असलेल्या कुटुंबातील संध्याताई.
अतिशय कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केले.
लहानपणा पासूनच झाडे लावण्याची आवड. ती अजूनही कायम आहे.
त्या व्यातिक्त नोकरी करून ,संसार सांभाळून ग्रामस्वच्छता अभियान , फॅमिली प्लॅनिग साठीचे काम अशी अनेकविध काम गावागावात , वाडा वस्तीत फिरून ,स्वतःचा पैसा खर्च करून त्या अजूनही करत आहेत.
हा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता , आहे.
त्यांचे अनुभव ऐकून कधी डोळे पाणावले तर कधी अंगावर काटा आला.
शहरात राहणाऱ्या आपल्या सारख्यांना कल्पनाही येणार नाही असेच त्यांचे आयुष्य आहे. त्यांना मनोमन ???
मित्र मैत्रिणींनो , अशा कार्यक्रमांना आपण नक्की येत रहा. रोटरी मुळे अशा अनेक व्यक्तींना अनुभवण्याची संधी मिळते.ती सोडू नका एवढेच मी नक्की सांगेन. ? |