Gurupournima - ShriMadbhagvadgeeteche MAhatmya

Meeting Details

Meeting Date 15 Jul 2022
Meeting Time 19:30:00
Location Dnyanada Vidyalay, DP Rpad
Meeting Type Regular
Meeting Topic Gurupournima - ShriMadbhagvadgeeteche MAhatmya
Meeting Agenda Guru & Samarpan Mi ka ragavto? Mazyakde sarv asun Manshanti ka nahi? Atmaprikshanatun Atmvikas Geeta
Chief Guest Dr Shirish Limaye
Club Members Present 43
Minutes of Meeting RCP Sahawas Mutatkar Ajay: We had our First Friday Fellowship Meeting of the New Rotary Year today, 15th July 2022. To commemorate *गुरु पूर्णिमा*, we arranged a Specialn Talk on *श्रीमद्भागवत गीतेचे महात्म्य* by Dr. Shirish Limaye. He explained, in his amiable, elucidating manner, the importance and necessity of Gita in our day-to-day life. It was Spiritual Start to the Rotary New Year ahead. Rtn. Hemant Godbole's introduction of the guest was very personal and inspiring and Ann. Tarini Lale's Thanksgiving was heart warming and just an icing on the cake. Thanks all Sahawasiy for your large attendance. Rtn. Ajay Mutatkar [16/07, 00:10] Rahul Lale: सहवासीहो, आजच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम "श्रीमद्भग्वद्गीतेचे महात्म्य" या अंतर्गत डॉ शिरिष लिमये सरांनी आपल्याला कर्म, धर्म, अध्यात्म यांच्यावर जे ओघवतं भाषण केलं त्याने आपणा साऱ्यांबरोबरच मीही मंत्रमुग्ध झालो. कर्माचं, कर्मफळाचं महत्त्व विषद करताना त्यांनी कर्मकांडाच्या, दांभिकपणाच्या वर्मावर जे बोट ठेवलंय, त्यामुळे आज आपल्या सर्वांनाच एक नवीन दृष्टी मिळाली असेल यात शंका नाही वेदव्यास यांचा जन्मदिवस.. आषाढी शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा असं सांगणाऱ्या डॉ लिमयेंच्या विवेचनातून मला पुढील मुद्दे महत्त्वाचे वाटले.. - व्यास... हे नाव नाही तर पदवी आहे, त्यांच्या नावाने पवित्र होते ते व्यासपीठ - व्यास म्हणजे जणू हिंदूधर्माचे निर्मातेच ..ज्यांनी अठरा पुराणं, भागवत, महाभारत लिहिली आणि त्याची अनूभूती अजूनही आपण घेत आहोत, त्यातला महाभारत या ग्रंथात १ लाख श्लोक आहेत, म्हणजे रामायणाच्या चौपट - महाभारत..उच्च विचाराची माणसं किती नीच वागू शकतात हे सांगतो तर भग्वदगीता कर्माचं महत्व सांगते - विवेकानंदांनी वनातले संन्यासी जनात आणले..धर्माचा उपयोग कर्मात आणला -सनातन तत्व...सनातन... ज्याला विरोध होऊ शकत नाही असा - यशस्वी कोण?... मनावर ताबा असणारा, इंद्रियांच्या घोड्यांचा लगाम ज्याच्या हातात आहे तो खरा यशस्वी - १९५५..६० साली...TS Elliot या ब्रिटिश कवीला गीता शिकावी वाटते, पण आपल्याकडच्या सोकॉल्ड हुशार माणसाला वाटत नाही हे दुर्भाग्य - गीता... वारंवार सलग गीता गीता असं म्हणलं की त्याग असा उच्चार होतो... गीता म्हणजे त्याग - गीता... जास्तीत जास्त विकत घेतला जाणारा , वाचला जाणारा जगातील दुसरा ग्रंथ - विवेकानंदांनी मॅक्सम्युल्लर ला गीता भेट दिली होती - सुखदुःख समे कृत्वा ...म्हणजे सुखदुःख समान मानणे हे अध्यात्म !! - अध्यात्म म्हणजे ...Changing oneself..Changing my vision to look at others -अध्यात्मात प्रगती कुठली?... अध्यात्म म्हणजे गती थांबवायची आहे - टिळकांनी तुरुंगात गीतारहस्य लिहिला, गीता अशी आत्मसात की पुन्हा न पहाता लिहून काढतील - गीतेत मनाला उभारी देणारे श्लोक, त्यामुळेच स्वातंत्र्य सेनानी घडले ...गीता म्हणजे पाचवा वेद... पंचम वेद..वेदांचा शेवटचा भाग...उपनिषदे...वेदांत ...उपनिषदांचं सार सांगणारा तो कृष्ण - शुध्द बुध्दीचा माणूस गीता समजू शकतो. - भगवानुवाच..गीतेत कृष्ण जे बोलतो ते .. जणू भगवंतांचेच विचार - श्रीकृष्ण उवाच...भागवतात कृष्ण जे बोलतो ते - मनातल्या विचारांबरोबर वाहून न जाता, तटस्थ पणे पहाणं, स्थिर राहणं हे गीत सार, ते अध्यात्म - कर्मात शरणागती हवी...हृदयात जाऊन वर्तनात आलं पाहिजे - विश्वास, भक्ती योग, कर्मयोग म्हणजे धर्म, म्हणजे अध्यात्म - समत्व म्हणजे योग...युज म्हणजेच ..जोडले जाणे म्हणजे योग - कर्माची संख्या वाढवणं म्हणजे कर्मयोग नाही... - कर्माला धर्माचं कवच असणं... म्हणजे कर्मयोग - कर्म करताना इंद्रियांवर कंट्रोल हवा - वानप्रस्थाश्रम...withdrawlism - Detachment..._ ती कधी येणार? - Children come through u but not from u - ते भगवंताचं देणं -देव कुठल्या स्वरूपात समोर येईल माहिती नाही, त्यामुळे समोर येईल ती प्रत्येक व्यक्ती म्हणजे देव - निर्हेतुक, तटस्थ होऊन कर्म केले पाहिजे - मध्यम मार्ग... निष्काम कर्म म्हणजे धर्म - फळ आणायचं नाही, फळ येत असतं - कर्म वर्तमानकाळात... फळ भविष्यकाळात ..त्यामुळे कर्म करताना फळाचा विचार नको - कर्मावर लक्ष...फळावर नको - कर्माचं फळ.. व्यक्ती सापेक्ष - सुख दुखते ते कसलं सुख? सर्व स्वीकार व्रत...मन बळकट करणे - फळ हा प्रसाद...प्रसादाला quality मूल्य आहे quantity मूल्य नाही किती सुंदर विचार आहेत ? प्रत्येक विचारावर एक निबंध लिहिता येईल.. डॉ शिरिष लिमयेंचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल रो सुधीर, रो पल्लवी, ऍन धनश्रीचे आभार रो हेमंतने करुन दिलेली ओळख व तारिणीचे आभारप्रदर्शनातून केलेले गुरुपूजन प्रभावी गुरु साक्षात परब्रह्म...तस्मै श्री गुरवे नम: !! नमस्कार?????? राहुल लाळे Secretary